You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      *“२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस”*

*“२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस”*

*वसई-विरार होणार टी.बी. मुक्त: महापौर श्री रूपेश जाधव*

*“२४ मार्च जागतिक क्षयरोग दिवस”* म्हणून संपुर्ण जगभर पाळला जातो. त्यानिमित्ताने विविध जन-जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले.
*दिनांक २८ मार्च* रोजी व.वि.श.म.च्या माता बाल संगोपन केंद्र, सर्वोदय वसाहत येथे गर्भवती महिलांसाठी क्षयरोग जनजागृति कार्यक्रम व प्रोटीन पाउडर चे मोफत वितरण करण्यात आले.वसई-विरार शहर महानगरपालिका क्षयरोग विभाग अंतर्गत गेल्या १० दिवस वसई-विरार परिसरामधे विविध जन जागृति व क्षय बाधित रुग्णांना औषधे,पोषक आहार,अंडी इत्यादि वस्तुंचे वितरण करण्यात आले.वसई-विरार शहर मधून क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात असून वसई-विरार मधून क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध आहेच व त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे असे आवाहन *मा. महापौर श्री रूपेश जाधव* यांनी उपस्थितांना केले.
क्षयरोग आजार फोफावण्याच्या मागचे महत्वाचे कारण म्हणजे औषधोपचार अनियमितपणे घेणे व नियमित आहरामधे प्रथिने व पोषक तत्वाची कमतरता असणे. महानगरपालिकेच्या सर्व २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टी. बी. चे औषध मोफत उपलब्ध आहे व सन २०२५ पर्यन्त क्षयरोग निर्मूलन करण्याचे शासनाचे धोरण असून वसई विरार शहर महानगरपालिका क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी कटिबध्द आहे असे आवाहन *डॉ. आशुतोष येजरे (शहर क्षयरोग अधिकारी)* यांनी केले. या कार्यक्रमामधे क्षयरोग आजार कसा होतो व त्यावर कसे नियंत्रण आणू शकतो या विषयी मार्गदर्शन *डॉ. हेमंत पाटिल* यांनी केले. *सौ निकिता पटेल* व *श्री अमित पटेल* यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून *उपमहापौर श्री. प्रकाश रोड्रिग्ज, सभापती श्री. नीलेश देशमुख, महिला बाल कल्याण उप- सभापती सौ. भावना शेवाळे, नगरसेविका सौ. रुपाली पाटिल, सौ. रेशमा जाधव, सलिमुनिस्सा समानी, नगरसेवक श्री. किशोर गजानन पाटील, डॉ. प्रवीण क्षीरसागर, परिवहन सदस्य श्री. अमित वैद्य, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सिंह चौहान, वैद्यकीय अधीक्षक (माता बाल संगोपन केंद्र, सर्वोदय वसाहत) डॉ. गायत्री गोरख व कृपा फाउंडेशन चे श्री. अमित पटेल* हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी शंभर गर्भवती महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी डॉ. गायत्री गोरख व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
  • माहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.