You are here:    Home      वसई विरार      वसई विरार शहर      महानगरपालिके विषयी

महानगरपालिके विषयी

वसई विरार हे शहर पालघर जिल्ह्यातील शहर आहे. बृहन्मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. वसई विरार शहराचे एकूण क्षेत्रफळ ३११ चौ.किमी आहे. वसई-विरार शहर हे बृहन्मुंबई व मीरा भाईदर ह्या शहरापासून वसई खाडीमुळे वेगळे झाले आहेत.रेल्वे सेवा व मुंबई अहमदाबाद ह्या राष्ट्रीय महामार्गामुळे मुंबईला जोडलेले आहे. तसेच वसई दिवा रेल्वे लाईनमुळे वसई विरार शहर, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण व पनवेल ह्या शहरांना जोडलेले आहे.

वसई-विरार शहर हे अति झपाट्याने वाढत असलेले शहर आहे. वसई विरार उपप्रदेश्याच्या उत्तरेस वैतरणा नदी आहे. दक्षिणेस वसई खाडी आहे, पश्चिमेस अरबी समुद्र असून, प्रदेश्याच्या पूर्वेकडील सीमेस सासूनवघर पासून चांदीप गावापर्यंत संपूर्ण जंगलानी व्यापलेली तुंगार पर्वतश्रेणी आहे. प्रदेशाच्या पूर्वेस अनेक टेकड्या आणि तुरळक शिखरे दिसून येतात. चिंचोटी धबधबा, तुंगारेश्वर मंदिर व घनदाट जंगल यामुळे पूर्वेकडील भागात पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास उत्तम संधी निर्माण झाली आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना दिनांक ३ जुलै २००९ रोजी झाली आहे. वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वच्छतेसाठी प्रयत्न करीत आहे.

Comments are closed.

आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७
  • माहिती तंत्रज्ञान विभाग दुरध्वनी क्र.- 7447404164

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.