You are here:    Home      Team Member      मा. श्रीमती प्रविणा ठाकूर
mayor-ph

मा. श्रीमती प्रविणा ठाकूर

महापौर

  संपर्क :- ०२५०-२५२५१०१


  पालघर जिल्ह्यांमध्ये एकमेव असलेल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी माझी निवड केल्याबद्दल तमाम वसई विरारच्या जनतेचे मन:पूर्वक आभार.


  स्वच्छ वसई, हरित वसई हे माझे ध्येय असून महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अंतर्गत आपले शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करित आहे.आपणांस माझे आव्हान राहील की महापालिकेच्या या महत्वकांक्षी कार्यक्रमांस सहकार्य करावे.


  आपण आपल्या शहराला हरित आणि सुंदर बनविण्यासाठी देखील झटणार आहोत. त्यासाठी वृक्ष लागवड करण्याकरिता मोहिम राबवित आहेत. यासाठी संपुर्ण परिसर हरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
  वसई विरार शहर महानगरपालिकेचा कार्यभार पारदर्शक होण्याच्यादृष्टीने महानगरपालिकेने ई-गव्हर्नर्स कार्यप्रणाली अंमलात आणली आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या घरपट्टी,पाणीपट्टी,जन्ममृत्यु,विवाह नोदणी,आवक-जावक विभाग,ई-निविदा कार्यप्रणाली संपूर्ण संगणकीकृत करुन नागरीकांना तात्काळ व पारदर्शक सोई-सुविधा मिळण्यावर भर दिला आहे.

  हया सर्व उपाययोजना करित असताना वसई विरार शहरामधील वाचन संस्कृतीचे जतन होणेसाठी व जास्तीत जास्त वाचकवर्ग निर्माण होण्यासाठी ई-लायब्ररीची संकल्पना महानगरपालिकेने अंमलात आणली असुन महानगरपालिकेच्या चारही वाचनालयांना एकत्र करुन वाचनालयांनी संगणकीय यंत्रणेद्वारे ई-लायब्ररी करण्यांत आली आहे.

  एक महिला महापौर म्हणून महिला सक्षमिकरण व सबळीकरणावर माझा भर राहीलच याचबरोबर वसई तालुक्यातील खेळाडूंच्या खेळाचा स्तर वाढावा तसेच खेळाडूंचा व विद्यार्थ्यांचा शारिरीक व मानसीक विकास घडावा या उद्देशाने महापौर मॅरेथॉन,वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव,विभागीय कलाक्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडू निर्माण करण्यांवर माझा भर राहील. त्याच बरोबर कलाकाराना एक चांगले व्यासपीठ निर्माण करण्यावर मी भर देणार आहे.

  याचबरोबर बालक,युवक,महिला व वरिष्ठ नागरिक यांच्या विकासासाठी महानगरपालिका विशेष योजना राबविणार आहे.


  शहराचा विकास करतांना नागरिकांना मध्यवर्ती ठेवून शहरामध्ये विविध विकास कामे आम्ही राबवत आहोत. बहुजनांचा विकास हाच आमचा श्वास हे ब्रीद वाक्य घेवून मी काम करत आहे.

  आपत्ती व्यवस्थापन

  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • ठाणे जिल्हा संपर्क क्रमांक : १०७७

  ई निविदा / दर पत्रक

  इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
  इथे क्लिक करा:- ई- निविदा

  वसई-विरार शहर महानगरपालिका

  वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.