PHASING OUT SINGLE USER PLASTIC
एकल वापर (सिंगल युज )प्लास्टिकचा वापर बंद करणे बाबत
दि.०४-०८-२०२२
एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक बंदी बाबत कार्यशाळा व घरगुती व घातक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन महापालिका सभागृहात करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेस मा. ऊपायुक्त (डॉ. चारुशीला पंडित), घनकचरा व्यवस्थापन व एमपीसीबीचे उप-प्रादेशिक अधिकारी श्री. पडवळ साहेब, महापालिका क्षेत्रातील विविध औद्योगिक संस्थांच्या असोसिएशनचे पदाधिकारी व महापालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक कनिष्ठ आरोग्य निरीक्षक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत प्लास्टिक बंदी वरील जनजागृती साठी उपस्थित इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना यांना कापडी पिशव्या, स्टिकर व पॅम्प्लेट्स चे वाटप करण्यात आले.
सर्वांनी कापडी पिशव्यांचाच वापर करावा असे जाहीर आवाहन देखील करण्यात आले.
तसेच सुका कचरा हा recyclers मार्फत व घातक कचरा हा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.
दिनांक:- ०६/०८/२०२२
सुरुची बिच, वसई येथील समुद्र किनारपट्टीची साफसफाई करण्यात आली असुन साफसफाई करण्यासाठी महानगरपालिकेतील प्रभाग समिती ‘आय’ चे सफाईकामगार व कनिष्ठ आरोग्य निरिक्षक सहभागी होते. किल्ला पाचू ग्रुप, किल्लाबंदर वसई या संस्थे मार्फत साफसफाई करण्यात आली. त्यात एकुण 35 जणांचा समावेश होता.
दिनांक:-१७/०८/२०२२
प्रभाग समिती सी विभागातील साईनाथ नगर या परिसरात प्लॅस्टिक पिशवी जप्ती मोहीम घेण्यात आली यावेळी ९ किलो प्लास्टिक व ६५०० रुपये दंड आकारण्यात आला.
दि. २६/०८/२०२२ रोजी स्वच्छ समुद्र मोहीम प्रभाग समिती आय येथिल सुरुची बीच येथे घेण्यात आली. या मध्ये संत गोंसालो गार्सिया काॅलेजचे ५०० विध्यार्थी तसेच आदर्श महिला बचत गट, ओमकार, नंदाई, सखी, संघर्ष, साईश्रम, सागरशेत, सावित्री, स्वावलंबी महीला बचत गटाच्या ५० महिला आणि प्रभाग समिती आय चे कर्मचारी व अधिकारी यांनी देखील सहभाग घेतला. असे एकुण ६०० लोकांचा सहभाग या स्वच्छता मोहीम मध्ये झाला
दिनांक:- २८/०८/२०२२
सुका कचरा गोळा करणे आणि पुनर्वापर याबाबत ध्यास फाउंडेशन मार्फत वसई येथे मोहीम घेण्यात आली.
दिनांक:- १२/०९/२०२२
प्रभाग समिती सी मधील फुलपाडा परिसरात प्लास्टिक पिशवी जप्ती मोहीम घेण्यात आली व ७ किलो प्लास्टिक व २५०० रुपये दंड करण्यात आला.
दिनांक:- १३/०९/२०२२
प्रभाग समिती सी विभागातील जीवदानी मंदिर पायथा परिसरात प्लॅस्टिक पिशवी जप्ती मोहीम घेण्यात आली व ५ किलो प्लास्टिक व १२०० रुपये दंड जमा करण्यात आले.
दिनांक: २३/०९/२०२२
प्रभाग समिती सी विभागातील स्टेशन परिसरात प्लॅस्टिक पिशवी जप्ती मोहीम घेण्यात आली व ७ किलो प्लास्टिक व ६५०० रुपये दंड जमा करण्यात आला.
दिनांक:- २६-०९-२०२२ रोजी प्रभाग समिती(आय) दुकानातील प्लास्टिक पिशवी जप्ती मोहीम करण्यात आली त्यामध्ये ३ किलो प्लास्टिक जमा करण्यात आले व ३५०० रु दंड आकारण्यात आला
दिनांक: 27/09/2022 रोजी प्रभाग समिती(H) दुकानातील प्लास्टिक पिशवी जप्ती मोहीम घेण्यात आली व त्यामध्ये 12 किलो प्लास्टिक जमा करण्यात आले व 6000 रु दंड आकारण्यात आला.