You are here:    Home      बातम्या आणि कार्यक्रम      ** *वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारा जनहितार्थ जारी* **

** *वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारा जनहितार्थ जारी* **

** *वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारा
जनहितार्थ जारी* **
सर्व नागरिकांना कळकळुन विनंती आहे की,
आपल्याकडे सर्व प्रत्येक शहरात, तालुक्यात आणि प्रत्येक गावात आणि शहरातील व गावातील प्रत्येक शाळेत अगदी मोफत… शासकीय आरोग्य विभागातर्फे measles + rubella लस मोहिम येत्या *२७ नोव्हेंबर ला सुरु होत आहे. हा संदेश सर्वांपर्यंत पोचवा*
तरी प्रत्येक नागरिकांनी फक्त शासनाची किंवा आरोग्य विभागाचीच जबाबदारी न समजता तुमचं गाव, तुमचं शहर, आपल्या कुटुंबातील मूल ही सामाजिक संकल्पना मनात ठेऊन आपल्या गावातील व शहरातील प्रत्येक बालकांना हवेतुन पसरणाऱ्या गोवर व रूबेला रोगापासुन संरक्षण देणारी ही लस देऊन त्यांना संरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न करुन आमच्या आरोग्य विभागाच्या मोहीमेत सहभागी व्हा ही विनंती.
आपल्याकड़े एखाद्या चांगल्या मोहीमेची सुरुवात होण्याआगोदर “”अफवा”” हया हवेतुन पसरणाऱ्या जंतुपेक्षा अधिक वेगाने आधी पोहचतात तरी आपण सगळे सुशिक्षित असून हया लसीबद्दल तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पालकांच्या मनात गैरसमज असतील तर त्यांना योग्य माहिती देवून त्यांना लस घेऊन बालकांना सुरक्षित करण्यास सांगा …
ही लस “”9 महीने ते 15 वर्षापर्यंतच्या बालकांना द्यावयाचि आहे म्हणजेच प्रत्येक “10 वी “”पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे
【 *सुरक्षितता* 】: – M/R लस अत्यंत सुरक्षित(safe) व प्रभावी (effective) आहे घाबरण्याचे कारण नाही.
1)सर्व मुलामुलींना ही लस देणे आवश्यक आहे.आधी घेतली असेल तरी.
आता पर्यंत १४ कोटी बालकांना भारतात हि लस दिली गेलेली आहे.
2) आतापर्यंत २२ राज्यांमध्ये हि M/R ची मोहीम राबविली गेली आहे.
कोणत्याच बाळाला काहीही झालेले नाही.
3) हि लस एकदा घेतल्यावर आयुष्यभर संरक्षण मिळवून देणार आहे.
4) हि मोहीम 5 आठवडे चालणार आहे.
5) तसेच ही लस AD सिरिंज द्वारे दिली जाते.
ही सिरिंज एकदा वापरात आल्यावर आपोआप lock होऊन त्या सिरिंज चा वापर पुन्हा करता येत नाही.ही सिरिंज फक्त “”गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथेच उपलब्ध असून तुमच बाळ अधिक कस सुरक्षित राहिल याची अधिक काळजी घेतली जाते.
हा आजार झाल्यास होणारे विपरीत परिणाम 【 लक्षण】: –
गोवर आजारामुळे :-
1)न्युमोनिया,अतिसार,मेंन्दूवर सुज येणे इ. आजार होऊ शकतात.
2)यामुळे मृत्यू सुद्धा होवू शकतो.
3)डोळ्यात टिक तयार होवू शकते.
4)गोवर आजारामुळे संपूर्ण भारतात 50,000 बालके मृत्यू पावतात.
5) बाळास कायमचा आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो.

गर्भवती मातेला रूबेला संसर्ग झाल्यास तिच्या होण्याऱ्या बाळास हा आजार होण्याची दाट शक्यता असते.
1)बाळाचा मेंदू छोटा असू शकतो.
2)बाळ जन्मताच अपंग असू शकते.
3)बाळाचे डोळे तिरपे तसेच डोळ्यात टिक असू शकते.
4)गर्भपात,प्रिमॅच्यूअर डिलीव्हरी होणे.
5)बाळास आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो.

*मा.श्री.सतिश लोखंडे( भाप्रसे)*
*आयुक्त*
*वसई विरार शहर* *महानगरपालिका*.

आपत्ती व्यवस्थापन

  • अतिरीक्त दुरध्वनी क्र(कोरोना कंट्रोल युनिट) -७०५८९१११२५/७०५८९९१४३०
  • कोरोना कंट्रोल युनिट दुरध्वनी क्र.-०२५०-२३३४५४६/०२५०-२३३४५४७
  • टोल फ्री क्रमांक : १८००२३३४३५३
  • पोलीस स्थानक : १००
  • अग्निशमन विभाग : १०१(फक्त BSNLवापरकर्ता साठी) / ०२५०-२४६४८११
  • वैद्कीय मदत : १०८
  • पालघर जिल्हा संपर्क क्रमांक : 02525 253 111
  • वैद्यकीय अधिकारी दुरध्वनी क्र.- 7720060519
  • नोडल ऑफिसर वैद्यकीय आरोग्य विभाग दुरध्वनी क्र.- 9987240750

ई निविदा / दर पत्रक

इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणाली
इथे क्लिक करा:- ई- निविदा

वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता, ई-प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी तसेच नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.