वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन येथील जुन्या योजनेच्या जॅक वेल मध्ये अतिवृष्टीमुळे गाळ,रेती आली असून त्यामुळे जुन्या योजनेच्या पंप चा फ्लो कमी झाला असल्यामुळे जॅक वेल मधील गाळ,रेती काढणे अतिआवश्यक असल्याने तसेच इतर इलेक्ट्रिक ची पॅनल व सबस्टेशन मधील दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने उद्या दिनांक 21/08/2019 रोजी सकाळी 09:00 am पासून अंदाजे पुढील 10/12 तास सुर्या धरणाच्या जुन्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद राहील.नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा चालू असला तरी जुन्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने पाणी पुरवठा अनियमित आणि कमी प्रमाणात होईल,तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे ही विनंती.
पाणी पुरवठा विभाग,
वसई विरार शहर महानगरपालिका.