महात्मा गांधी जयंती निमित्त दिनांक ०२/१०/२०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका, विद्युत विभागामार्फत अक्षय ऊर्जा स्त्रोतांचे वापरास प्रोत्साहन देणे करिता जनजागृती रॅली राबविण्यात आली. कार्यक्रम दरम्यान नागरिकांना वसुंधरा संवर्धनासाठी अक्षय ऊर्जा स्त्रोताचे जास्तीत जास्त वापरास प्रोत्साहन देण्यात आले तसेच त्याबाबत फायदे समजविण्यात आले.

सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त दिनांक २३/०९/२०२३ रोजी ५ दिवसांचे गणेश विसर्जन दरम्यान वसई विरार शहर महानगरपालिका, विद्युत विभागामार्फत विविध तलावांवर अक्षय ऊर्जा स्त्रोतांचे वापरास प्रोत्साहन देणे करिता जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. कार्यक्रम दरम्यान नागरिकांना वसुंधरा संवर्धनासाठी अक्षय ऊर्जा स्त्रोताचे जास्तीत जास्त वापरास प्रोत्साहन देण्यात आले तसेच त्याबाबत फायदे समजविण्यात आले.

X