वसई-विरार हे शहर पालघर जिल्ह्यातील शहर आहे . बृहन्मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे . वसई-विरार शहराचे एकूण क्षेत्रफळ ३११ चौ. किमी आहे. वसई-विरार शहर हे बृहन्मुंबई व मीरा-भाईंदर ह्या शहरांपासून वसई खाडी मुळे वेगळे झाले आहे . रेल्वे सेवा व मुंबई अहमदाबाद ह्या राष्ट्रीय महामार्गाने मुंबईला जोडलेले आहे . तसेच वसई दिवा रेल्वे लाईन मुळे नवी मुंबई , ठाणे , भिवंडी , कल्याण व पनवेल ह्या शहरांना जोडलेले आहे .
वसई विरार शहर हे अति झपाट्याने वाढत असलेले शहर आहे . वसई विरार उपप्रदेश्याच्या उत्तरेस वैतरणा नदी आहे . दक्षिणेस वसई खाडी आहे , पश्चिमेस अरबी समुद्र असून , प्रदेशाच्या पूर्वेकडील सीमेस ससुनवघर पासून चांदीप गावापर्यंत संपूर्ण जंगलांनी व्यापलेली तुंगार पर्वतश्रेणी आहे .
प्रदेशाच्या पूर्वेस अनेक टेकड्या आणि तुरळक शिखरे दिसून येतात . चिंचोटी धबधबा तुंगारेश्वर मंदिर , व घनदाट जंगल यामुळे पूर्वेकडील भागात पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास उत्तम संधी निर्माण झाली आहे .
वसई विरार शहराची स्थापना दिनांक ३ जुलै २००९ रोजी झाली आहे . वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनामध्ये पारदर्शकता , ई -प्रशासन आणि संपूर्ण स्वछतेसाठी प्रयत्न करीत आहे .
Hello