पीओपी मूर्ती नकोच…..
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करूया. यासाठी आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींना नको म्हणुया आणि इकोफ्रेंडली अर्थात शाडुच्या मातीच्या मूर्तींचा स्विकार करुया.
शाडूची माती पर्यावरणास लाभदायक
गणेशोत्सवात शाडुच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. काळाच्या ओघात, बदलत्या जीवनशैलीत अनेक पारंपरिक गोष्टी मागे पडल्या पण आज आपल्या पर्यावरणाच्या बचावासाठी पुन्हा एकदा जुन्या परंपरेला उजाळा देण्याची गरज आहे. शाडूची माती नैसर्गिक असते. ती जमिनीत मुरते आणि पाण्यात विरघळते. त्यापासून निसर्गाला कसलीही हानी होत नाही. त्यामुळे आपण शाडुच्या मातीच्या मुर्तींचा स्विकार करुया.
इको गणेशा, वसुंधरेच्या संवर्धनासाठी या उपक्रमांतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न करते आहे. आपण सर्वांनीच या उपक्रमात सामील होऊन, आपल्या वसई विरार शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहाकार्य करा आणि आपल्या घरी गणपती आणताना तो शाडू माती किंवा चिकण मातीचा आणा. यंदा चिकणमातीच्या गणेश मुर्त्यांना मोठी मागणी मिळत आहे. तसेच या मुर्त्या पर्यावरणस्नेही असल्याने त्यांचा स्वीकार करणे म्हणजे आपल्या शहराची हानी टाळणे.
वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण पुरक घरगुती गणेशउत्सव २०२३-२४ तसेच पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेशोत्सव २०२३-२४ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचा निकाल खालील प्रमाणे.
पर्यावरण पुरक घरगुती गणेशउत्सव २०२३-२४ | |
---|---|
प्रभाग समिती A | View |
प्रभाग समिती B | View |
प्रभाग समिती C | View |
प्रभाग समिती D | View |
प्रभाग समिती E | View |
प्रभाग समिती F | View |
प्रभाग समिती G | View |
प्रभाग समिती H | View |
प्रभाग समिती I | View |
पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेशोत्सव २०२३-२४ | |
---|---|
प्रभाग समिती A | View |
प्रभाग समिती B | View |
प्रभाग समिती C | View |
प्रभाग समिती D | View |
प्रभाग समिती E | View |
प्रभाग समिती F | View |
प्रभाग समिती G | View |
प्रभाग समिती H | View |
प्रभाग समिती I | View |