वसई विरार शहर महानगरपालिका

प्रधानमंत्री आवास योजना

योजनेची सद्यस्थिती

      देशातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी, शौचालय व्यवस्था, 24 तास वीज व पोच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे असे विचारात घेऊन मा. पंतप्रधान महोदयांच्या सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद शासनाने नागरी भागाकरीता ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सुरु केली आहे. या अनुषंगाने या योजनेची राज्यात अंमलबजावणी करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासन निर्णय क्र. प्रआयो 2015/प्र. क्र .110/ गृनिधो-28 सेल दि.09/12/2015 अन्वये पारीत आहे.

  सर्वांसाठी घरे 2022 या संकल्पनेवर आधारित ‘प्रधानमंत्री आवास योजने’ च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील चार घटक समाविष्ट आहेत.

1.      जमिनीचा साधन संपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपडपट्टयांचा’ आहे तेथेच ‘पुनर्विकास करणे.

2.      कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यामातून आर्थिक दृष्टया दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.

3.      खाजगी भागीदारीव्दारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.

4.      आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील लाभार्थ्यांव्दारे वैयत्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान.

X