वसई-विरार शहर महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागाची माहिती

विभागाचे नाव: वृक्ष प्राधिकरण विभाग

विभागाची थोडक्यात माहिती :-
1.महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अन्वये महानगरपालिका हद्दीतील झाडांचे संरक्षण व जतन करणे.
2.महानगरपालिका हद्दीतील दुभाजके, मोकळे भूखंड, उद्याने व तलाव उद्याने विकसित / सुशोभिकरण करणे.
3.विकास कामात बाधित होणा-या वृक्ष कापणीच्या परवानग्या तयार करणे, झाडे छाटणीच्या परवानग्या तयार करणे.
4.नव्याने होणा-या इमारती सभोवताली विकासक यांच्याकडून विविध प्रकारची झाडे लावणेबाबत नाहरकत दाखले प्रदान करणे.
5.अवैध वृक्षतोडीबाबत आलेल्या तक्रारींचे निवारण करणे.

विभागात कार्यरत असलेल्या प्रमुखाची नाव व हुद्दा :-

अधिकाऱ्याचे नाव पद ई-मेल
श्रीमती. प्रियांका राजपूत उप आयुक्त garden.vvmc@gov.in
श्री.नरेंद्र मानकर अधिक्षक garden.vvmc@gov.in

विभागाची कामे:-
1.वनसंवर्धन, वृक्षप्राधिकरण, उद्यान विभागातील सर्व कामांचे व्यवस्थापन करणे तसेच मा. आयुक्त व मा. उप आयुक्त यांच्या संपर्कात राहून कामाचे नियोजन करणे.
2.महाराष्ट्र शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करणे तसेच मा. राज्य शासनाकडून वेळोवेळी येणा-या सुचना व निर्णय यांच्या अधिन राहून त्यावर कार्यवाही करणे.
3.महानगरपालिका हद्दीतील दुभाजके, मोकळे भूखंड, उद्याने व तलाव उद्यानांकरिता आरक्षित असलेले भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर ते विकसित / सुशोभिकरण करणे.
4.वृक्ष लागवडीकरीता भूखंडाचे सर्वेक्षण करुन गट लागवड करणे.
5.महानगरपालिका हद्दीतील झाडांचे सरंक्षण, जतन करणे, झाडांचे विद्रुपीकरण व अवैध वृक्षतोडीवर आलेल्या तक्रारींचे निवारण करणे.
6.नव्याने तयार होणा-या इमारतींच्या सभोवताली विकासक यांस त्यांच्या बांधकाम क्षेत्रानुसार झाडांची लागवड करण्याकरीता नगररचना विभागामार्फत देण्यात येणारे नाहरकत प्रदान करण्यासाठी वृक्षप्राधिकरण विभागाचे अभिप्राय सादर करणे.
7.रस्त्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्याची छाटणी करणे.

 

X