वसई-विरार शहर महानगरपालिका जन्म मृत्यू विभागाची माहिती

विभागाचे नाव: जन्म मृत्यू विभाग

विभागाची थोडक्यात माहिती :-

1)जन्म-मृत्यु विषयासंबधीत तक्रारीचे निवारण करणे.
2)जन्म-मृत्युचे अर्ज देणे व स्वीकारणे करणे.
3)जन्म-मृत्यु प्रमाणपत्र वितरीत करणे.
4)दहन/दफन दाखले अर्ज स्वीकारणे व दाखले वितरीत करणे.
5)जन्म-मृत्यु चे नोंद न अनुपलब्धता प्रमाणपत्र करिता आलेले अर्ज स्वीकारणे व दाखले वितरीत करणे

विभागात कार्यरत असलेल्या प्रमुखाची नाव व हुद्दा :-

अधिकाऱ्याचे नाव पद ई-मेल
श्री. समीर भूमकर उपायुक्त vvcmcmarriage@gmail.com
श्री. प्रितम अनिल मोहिते लिपीक/टंकलेखक vvcmcmarriage@gmail.com
कु.प्रियांका प्रभाकर चोरघे लिपीक/टंकलेखक (ठेका) vvcmcmarriage@gmail.com
कु. सारिका अनंत म्हात्रे लिपीक/टंकलेखक (ठेका) vvcmcmarriage@gmail.com

विभागाची कामे:-
1)जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 अन्वये जन्म व मृत्यूची नोंद घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. जन्म व मृत्यूची घटना रुग्णालय अथवा घरी झाल्यास सदर क्षेत्र महापालिकेच्या ज्या विभागाच्या (प्रभाग समिती) अखत्यारित येते त्या संबधित विभाग (प्रभाग समिती) कार्यालयात जन्म व मृत्यूची नोंद करण्यात येते. नागरिक संबंधित विभागाच्या कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स. 09.45 ते संध्या. 6.15 वाजेपर्यंत विहित नमुन्यामध्ये अर्ज करुन व विहित शुल्क भरुन प्राप्त करुन घेऊ शकतात.

2)जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 14 अन्वये जन्म प्रमाणपत्रामध्ये एकदा नोंदविलेले नाव पुन्हा बदलता येत नाही. नावाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाल्यास दुरुस्ती करता येते जसे की, ‘i’उच्चार ची दुरुस्ती ‘ee’ परंतु नावाचा उच्चार बदली होता कामा नये.

3)जन्माची घटना घडल्यापासून 15 वर्षाच्या आत बाळाचे नाव जन्म प्रमाणपत्रामध्ये नोंदविता येते.

4)जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या अन्वये ज्या क्षेत्रात जन्म व मृत्यू ची घटना घडली त्याच क्षेत्राच्या स्थानिक संस्थेच्या ( उदा. पंचायतसमिती /ग्रामपंचायत / नगर परिषद/ नगरपालिका / महानगरपालिका) निबंधकाकडून जन्म किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र मिळते.

5)जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 20 अन्वये, बाळाचे आई-वडील जर भारतामध्ये स्थायिक होण्यासाठी आले असतील, तर ते भारतामध्ये आल्यापासून 60 दिवसांच्या आत भारतीय दूतावासामध्ये जन्माची नोंदणी करता येते.

6)जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 20 अन्वये, एखादया भारतीय व्यक्ती भारताबाहेर मृत पावली असेल तर 60 दिवसांच्या आत भारतीय दूतावासामध्ये मृत्यूची नोंदणी करता येते.

 

X