वाचनालय विभाग

विभागाचे ध्येय व धोरण: वाचन व संस्कृती वाढविणे, वाचकांना चांगल्या प्रकारे सेवा देणे.

कामाचे विस्तुत स्वरुप:

  1. सार्वजनिक वाचनालय विभागातील सर्व कामाचे व्यवस्थापन करणे तसेच मा. आुयक्त व मा. उपायुक्त यांच्या संपर्कात राहून कामाचे नियोजन करणे.
  2. महाराष्ट्र शानाच्या ई-प्रशासन धोरणाची अंमलबजावणी करणे तसेच मा. राज्य शासनाकडून वेळोवेळी येणा-या सुचना व निर्णय यांच्या अधिन राहून त्यावर कार्यवाही करणे.
  3. सार्वजनिक वाचनालय अंतर्गत विविध दैनंदिन कामाचे संगणकीकरण करणे.
  4. महानगरपालिकेचे संकेतस्थळावर ग्रंथालयाची माहिती अद्यावत करणे.
  5. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालया करीता लागणारे ग्रंथ खरेदी करणेकामी प्रस्ताव तयार करणे. दरपत्रक प्रासिध्द करणे प्राप्त दरपत्रकापैकी मंजुर दरपत्रकाधारकाकडून संविदा करुन ग्रंथ खरेदी करणे.
  6. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालया करीता लागणारे दैनदिंन वर्तमानपत्रे, मासिके,साप्ताहिके, पाक्षिके व दिवाळी अंक करणेकामी प्रस्ताव तयार करणे, दरपत्रक प्रासिध्द करणे प्राप्त दरपत्रकांपैकी मंजुर दरपत्रकाधारकाकडून संविदा करुन ग्रंथ खरेदी करणे.
  7. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालयातील रद्दी विक्री करणेकामी प्रस्ताव तयार करणे, दरपत्रक प्रासिध्द करणे प्राप्त दरपत्रकापैकी मंजुर दरपत्रकाधारकाकडून संविदा करुन रद्दी विक्री करणे.
  8. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालयातील जुनी पुस्तके बायडींग करणेकामी प्रस्ताव तयार करणे, दरपत्रक प्रासिध्द करणे प्राप्त दरपत्रकापैकी मंजुर दरपत्रकाधारकाकडून संविदा करुन पुस्तके बायडींग करणे.
  9. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालयात पेस्ट कंट्रोल करणेकामी प्रस्ताव तयार करणे, दरपत्रक प्रासिध्द करणे प्राप्त दरपत्रकापैकी मंजुर दरपत्रकाधारकाकडून संविदा करुन पेस्ट कंट्रोल करणे.
  10. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालय विभागामार्फत विविध सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करणे.
  11. सार्वजनिक वाचनालय विभागामार्फत वाचनालयाचा लाभ घेण्यासाठी येणा-या वाचक व विद्यार्थी यांना सेवा प्रदान करणे.

आकृतीबंध

अधिकारी

नाव पदनाम संपर्क क्र ई - मेल आयडी
श्री सदानंद पुरव उपायुक्त 9819197999
श्री अमित मोदी ग्रंथपाल 9004006077
सौ.स्वाती घरत ग्रंथपाल 9860656512
श्री अमित पाटील सहाय्यक ग्रंथपाल 7710025680
X