वसई-विरार शहर महानगरपालिका

वसई विरार हे शहर पालघर जिल्ह्यातील शहर आहे. बृहन्मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. वसई विरार शहराचे एकूण क्षेत्रफळ ३११ चौ.किमी आहे.

वसई-विरार शहर हे अति झपाट्याने वाढत असलेले शहर आहे. वसई विरार उपप्रदेश्याच्या उत्तरेस वैतरणा नदी आहे. दक्षिणेस वसई खाडी आहे, पश्चिमेस अरबी समुद्र असून, प्रदेश्याच्या पूर्वेकडील सीमेस सासूनवघर पासून चांदीप गावापर्यंत संपूर्ण जंगलानी व्यापलेली तुंगार पर्वतश्रेणी आहे. प्रदेशाच्या पूर्वेस अनेक टेकड्या आणि तुरळक शिखरे दिसून येतात. चिंचोटी धबधबा, तुंगारेश्वर मंदिर व घनदाट जंगल यामुळे पूर्वेकडील भागात पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास उत्तम संधी निर्माण झाली आहे.

X