नगर नियोजन
नगर नियोजन
महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे प्रमुख कामकाल पहाणे व महानगरपालिकाआयुक्त यांना थेट अहवाल सादर करणे.
विकास योजनेची अंमलबजावणी
- विकास योजनेची अंमलबजावणीसाठी प्राथम्ययादी तयार करून त्यानुसार अंमलबजावणीसाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करणे.
- केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासनाच्या विविध योजनाखाली अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करणे व त्या अनुषंगाने शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करणे
- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम/भूसंपादन नियमांतर्गत विकाय योजनेच्या प्रस्तावाखाली जमिनीच्या भूसंपादनांसाठी आवश्यक ती कार्यवाही करणे, जमिनीच्या मुल्याकांनाचा प्राथमिक अहवाल तयार करणे.
- विकास योजनेबाबत आवश्यकतेनुसार फेरबदलाचे प्रस्ताव तयार करणे.
- महानगरपालिकेला नगररचना विषयाशी संबधित प्रकरणात तांत्रिक सल्ला देणे
- विकास योजनेच्या अंमलबजावणीबाबतची सर्व प्रकरणे हाताळणे.
विकास नियंत्रण
महाराष्ट्र प्रादशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 44 अंतर्गत प्राप्त विविध बांधकाम परवानगी , विकास परवानगी , अभिन्यास मंजूरीच्या प्रकरणांची छाननी करणे, आुयक्त म.न.पा यांच्या मंजूरीने प्रारंभ प्रमाणपत्र, बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र इ. अनुषंगिक कामाबाबत कार्यवाही करणे.
महानगरपालिकेतील प्रभाग अधिका-यांना व इता संबधितांना अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात महाराष्ट्र प्रादशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम 52,53,54, व 55 च्या अनुषंगाने सल्ला व मार्गदर्शन देणे.
आकृतीबंध
अधिकारी
विभागाचे नाव | विभाग प्रमुख | पदनाम | ई - मेल आयडी |
---|---|---|---|