Har Ghar Tiranga 2024

  • Home
  • Har Ghar Tiranga 2024

घरो घरी तिरंगा 2024

आज ९ ॲागस्ट २०२४ क्रांतीदिना निमित्त हुतात्मा बाळा सावंत स्मारक पापडी, वसई येथे मा. श्री संजयजी हेरवाडे साहेब (अतिरिक्त आयुक्त) यांचे शुभहस्ते ध्वजवंदन करण्यांत आले.

९ ॲागस्ट २०२४ क्रांतीदिना निमित्त हुतात्मा बाळा सावंत स्मारक पापडी, वसई येथे मा. श्री संजयजी हेरवाडे साहेब (अतिरिक्त आयुक्त) यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वंदन केले,तसेच इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्प अर्पण करून वंदन केले.

‘घरोघरी तिरंगा’ अभियाना अंर्तगत आय प्रभाग समिती तर्फे शपथ विधी ( Pledge) आयोजित करण्यात आला होता.तरी सदर कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

‘घरोघरी तिरंगा’ या अभियाना अंर्तगत आय प्रभाग वसई तर्फे स्वातंत्र्यसैनिक यांचे कुटुंबिय यांचा मा. श्री संजयजी हेरवाडे साहेब ( अतिरिक्त आयुक्त ) यांचे हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यांत आला.त्याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
दि १२-८-२०२४ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत घरोघरी तिरंगा या योजनेअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

घरोघरी तिरंगा या शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत दि. १३/८/२०२४ रोजी सांस्कृतिक व क्रीडा विभागाने मॅरेथॉन आयोजित केली होती.

Skip to content