वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे
  • जन्म मृत्यू विभाग

    जन्म मृत्यू विभाग

    विभागाची थोडक्यात माहिती

    1. जन्म-मृत्यु विषयासंबधीत तक्रारीचे निवारण करणे..
    2. जन्म-मृत्युचे अर्ज देणे व स्वीकारणे करणे.
    3. जन्म-मृत्यु प्रमाणपत्र वितरीत करणे.
    4. जन्म मृत्यू नोंदणी हि एक वर्षाच्या आत न केल्यास त्यास नियम १३ नुसार उशिरा नोंदणी ची प्रक्रिया करून जन्म-मृत्यूची नोंद करता येते.
    5. जन्म-मृत्यु चे नोंद न अनुपलब्धता प्रमाणपत्र करिता आलेले अर्ज स्वीकारणे व दाखला वितरीत करणे.
    विभागाची कामे:

    1. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 अन्वये जन्म व मृत्यूची नोंद घटना घडल्यापासून 21 दिवसांच्या आत करणे बंधनकारक आहे. जन्म व मृत्यूची घटना रुग्णालय अथवा घरी झाल्यास सदर क्षेत्र महापालिकेच्या ज्या विभागाच्या (प्रभाग समिती) अखत्यारित येते त्या संबधित विभाग (प्रभाग समिती) कार्यालयात जन्म व मृत्यूची नोंद करण्यात येते. नागरिक संबंधित विभागाच्या कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स. 09.45 ते संध्या. 6.15 वाजेपर्यंत विहित नमुन्यामध्ये अर्ज करुन व विहित शुल्क भरुन प्राप्त करुन घेऊ शकतात.
    2. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 14 अन्वये जन्म प्रमाणपत्रामध्ये एकदा नोंदविलेले नाव पुन्हा बदलता येत नाही. नावाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाल्यास दुरुस्ती करता येते जसे की, ‘i’उच्चार ची दुरुस्ती ‘ee’ परंतु नावाचा उच्चार बदली होता कामा नये.
    3. जन्माची घटना घडल्यापासून 15 वर्षांपर्यंत बाळाचे नाव जन्म नोंदणी प्रमाणपत्रावर नोंदवता येते..
    4. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या अन्वये ज्या क्षेत्रात जन्म व मृत्यू ची घटना घडली त्याच क्षेत्राच्या स्थानिक संस्थेच्या ( उदा. पंचायतसमिती /ग्रामपंचायत / नगर परिषद/ नगरपालिका / महानगरपालिका) निबंधकाकडून जन्म किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र मिळते.
    5. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 20 अन्वये, बाळाचे आई-वडील जर भारतामध्ये स्थायिक होण्यासाठी आले असतील, तर ते भारतामध्ये आल्यापासून 60 दिवसांच्या आत भारतीय दूतावासामध्ये जन्माची नोंदणी करता येते.

    अधिकारी

    विभागप्रमुख पदनाम संपर्क क्रमांक ईमेल पत्ता
    श्रीमती हर्षला राणे उपायुक्त 02506630000