वाहतूक सेवा
वसई-विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा दि.०३ ऑक्टोंबर २०१२ रोजी सुरु झाली. सुरु करणेत आलेली परिवहन सेवा ही BOOM (Buy, Own, Operate & Maintain) तत्वावर रॉयल्टी बेसिसवर चालविणेस देण्यात आलेली आहे. त्यामुळे बस, बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांचे वेतन तसेच बससाठी लागणारे इंधन, दुरुस्ती, विमा व इतर अनुषंगिक खर्च हा बस ऑपरेटर यांस करावा लागतो व प्रती बस पोटी रॉयल्टी महापालिकेस अदा करावी लागते. यामध्ये महापालिकेस कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही याउलट महापालिकेस रॉयल्टी व जाहिरात फी स्वरुपात उत्पन्न प्राप्त होते.
परिवहन विभागाकडून सेवा पुरविल्या जातात