वाचन आणि संस्कृतीला चालना देणे, वाचकांना चांगली सेवा देणे.
कामाचे विस्तुत स्वरुप:
सार्वजनिक ग्रंथालय विभागातील सर्व कामांचे व्यवस्थापन करणे आणि माननीय आयुक्त, माननीय अतिरिक्त आयुक्त आणि माननीय उपायुक्त यांच्या संपर्कात राहून कामाचे नियोजन करणे.
महाराष्ट्र राज्याच्या ई-शासन धोरणाची अंमलबजावणी करणे आणि माननीय राज्य सरकारकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचना आणि निर्णयांच्या अधीन राहून त्यावर कार्यवाही करणे.
सार्वजनिक वाचनालय अंतर्गत विविध दैनंदिन कामाचे संगणकीकरण करणे.
महानगरपालिकेचे संकेतस्थळावर ग्रंथालयाची माहिती अद्यावत करणे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालयाकरिता लागणारे ग्रंथ खरेदी करणेकामी प्रस्ताव तयार करणे. दरपत्रक प्रसिद्ध करणे प्राप्त दरपत्रकापैकी मंजूर दरपत्रकाधारकाकडून संविदा करुन ग्रंथ खरेदी करणे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक ग्रंथालयांसाठी आवश्यक असलेली दैनंदिन वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिक, पाक्षिक, मासिके, त्रैमासिक, सहामाही मासिके, वार्षिक मासिके आणि दिवाळी अंक खरेदी करणेकामी प्रस्ताव तयार करणे, किंमत यादी प्रकाशित करणे, प्राप्त किंमत यादींपैकी मंजूर किंमत यादी धारकांकडून करार करून पुस्तके खरेदी करणे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालयातील रद्दी विक्री करणेकामी प्रस्ताव तयार करणे, दरपत्रक प्रसिद्ध करणे प्राप्त दरपत्रकापैकी मंजूर दरपत्रकधारका समवेत संविदा करुन रद्दी विक्री करणे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालयातील जुनी पुस्तके बायडींग करणेकामी प्रस्ताव तयार करणे, दरपत्रक प्रसिद्ध करणे प्राप्त दरपत्रकापैकी मंजूर दरपत्रकधारका समवेत संविदा करुन पुस्तके बायडींग करणे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालयात पेस्ट कंट्रोल करणेकामी प्रस्ताव तयार करणे, दरपत्रक प्रसिद्ध करणे प्राप्त दरपत्रकापैकी मंजूर दरपत्रकधारका समवेत संविदा करुन पेस्ट कंट्रोल करणे.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाचनालय विभागामार्फत विविध शासकीय सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
सार्वजनिक वाचनालय विभागामार्फत वाचनालयाचा लाभ घेण्यासाठी येणा-या वाचक व विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार आवश्यक ते वाचन साहित्य उपलब्ध करून देणे व त्यांच्या शंकांचे निरसन करणे.
डॉ.के.ब. हेडगेवार वाचनालयामार्फत वाचकांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा : -
ग्रंथ देवाण घेवाण सेवा –वाचकांनी आणलेला ग्रंथ जमा करुन वाचकांना हवा असलेला ग्रंथ उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र ग्रंथ देवाण घेवाण कक्ष आहे.
संदर्भ सेवा – विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत बसून अभ्यास करण्यासाठी आवश्यक संदर्भ साहित्य पुरविले जाते.
वाचन कक्ष – वाचनालयात येणाऱ्या बाल , महिला व प्रौढ वाचकांसाठी अनुक्रमे स्वतंत्र बालविभाग , स्वतंत्र महिला विभाग व स्वतंत्र प्रौढ विभाग आहेत.
पुस्तकांची सुची – वाचकांना पुस्तकांची निवड करणे सोईस्कर व्हावे व वाचकांचा वेळ वाचावा यासाठी वाचनालयात उपलब्ध पुस्तकांची विषयवार व लेखकांच्या नावानुसार सुची तयार करुन ती वाचकांना उपलब्ध करुन दिली जाते.
दिवाळी अंक व नविन ग्रंथ – दरवर्षी प्रकाशित होणारे नविन दिवाळी अंक व ग्रंथ वाचकांच्या मागणीनूसार खरेदी करण्यात येतात
पिण्याच्या पाण्याची सुविधा – वाचनालयात दररोज अंदाजित 25 ते 30 वाचक पुस्तकाची देवाण घेवाण करण्यासाठी येतात . संदर्भ साहित्याचा लाभ घेण्यासाठी अंदाजित 10 ते 15 अभ्यासक ,प्राध्यापक व विद्यार्थी तसेच अंदाजित 50 पेपर वाचक वाचनासाठी येतात. विविध परिक्षाचा अभ्यास करण्यासाठी दररोज अंदाजित 250 ते 300 विद्यार्थी व विद्यार्थीनी येतात. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी 2 आरो मशीन लावण्यात आल्या आहेत
जनरेटरची सुविधा – अभ्यास करताना लोड शेडीगचा त्रास मुलांना होऊ नये म्हणुन जनरेटरची सुविधा करण्यात आलेली आहे
विविध कार्यक्रम – वाचनालयाचा लाभ घेणाऱ्या वाचक व विद्यार्थ्यांकरिता दिवाळी पहाट , साहित्य जल्लोष, स्पर्धापरीक्षा व्याख्यान , संपादक संमेलन, ग्रंथ, शस्त्र व नाणी प्रदर्शन , जागतिक मराठी भाषा दिन , वाचन प्रेरणा दिन , जागतिक पुस्तक दिन , निबंध स्पर्धा, वत्कृत्त्व स्पर्धा यासारखे विविध प्रकारचे सामाजिक , सांस्कृतीक साहित्यिक व शैक्षणीक कार्यक्रम राबविले जातात.
ग्रंथेत्तर साहित्य - वाचनालयाचा लाभ घेणाऱ्या वाचक व विद्यार्थ्यांकरिता ग्रंथांव्यतिरिक्त मराठी , इंग्रजी, गुजराती, हिंदी व उर्दु भाषेतील वर्तमानपत्र तसेच साप्ताहिके , मासिके, पाक्षिके , त्रैमासिके , वार्षिके , स्पर्धा परिक्षा मासिके इत्यादी साहित्य उपलब्ध करुन दिले जाते
ओपन लायब्ररी सिस्टीम - वाचकांना पुस्तके निवडणे सोपे व्हावे आणि वाचकांचा वेळ वाचावा यासाठी, लायब्ररीमध्ये ओपन लायब्ररी सिस्टीम स्वीकारण्यात आली आहे. ज्याद्वारे वाचक थेट शेल्फमध्ये जाऊन पुस्तके निवडू शकतात.
मोफत वृत्तपत्र वाचन सुविधा - सध्या ग्रंथालयात वाचकांना मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांमधील एकूण २६ वर्तमानपत्रे आणि १५ प्रकारची मासिके मोफत वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात.
अभ्यासाची सुविधा - ग्रंथालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यास कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या अभ्यास कक्षात दररोज अंदाजे ३०० विद्यार्थी येतात.
मोफत मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग सुविधा - वाचनालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे.
स्वतंत्र ग्रंथालय - ग्रंथालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील शैक्षणिक पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक पुस्तकांचे एक स्वतंत्र ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे.
वाचकांना त्यांच्या आवडीनुसार घरी घेऊन जाण्यासाठी विविध प्रकारचे वाचन साहित्य - कथा, कादंबऱ्या, चरित्र, नाटके, कविता, ललित गद्य आणि मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी आणि उर्दू भाषांमधील इतर पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.
जंतुनाशक फवारणी: - ग्रंथालयात उपलब्ध असलेली सर्व पुस्तके, शेल्फ, लाकडी फर्निचर आणि विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेवर वर्षातून ३ वेळा जंतुनाशक फवारणी केली जाते जेणेकरून ऊन, वारा, पाऊस, धूळ, पुस्तकी किडे आणि दमट वातावरणाचा परिणाम टाळता येईल.
डॉ.के.ब. हेडगेवार वाचनालयामार्फत वाचकांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा : -