महानगरपालिकेची एकूण 12 मैदाने असून त्यामधील 8 विकसीत व 4 प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर विरार पश्चिम येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्यात आहे. या मैदानावर सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंकडून महानगरपालिका कोणतेही शुल्क आकारत नाही. तथापि क्रिकेट च्या व्यावसायिक स्पर्धेकरिता १००० प्रति दिवस ( एक पीच ) करिता फी आकारली जाते. सरावाकरिता व व्यावसायिक स्पर्धेकरिता सकाळी ६ ते सायंकाळी ७ अशी वेळा आहेत. याच बरोबर नवघर माणिकपूर प्रभाग समिती एच कार्यालय हद्दीत शुटिंग रेंज असून याचे सराव शुल्क पुढील प्रमाणे आहे. vvcmc शूटिंग रेंज फी संरचना मूलभूत अभ्यासक्रम (सर्व शुल्क समाविष्ट) 6 दिवसांचा कोर्स : ₹4000/- 1 महिन्याचा कोर्स : ₹6000/- नियमित प्रशिक्षण शुल्क (केवळ मूलभूत अभ्यासक्रमानंतर परवानगी ) पेपर टार्गेट फी: दररोज : ₹200/- मासिक : ₹1800/- 3 महिने : ₹5400/- 6 महिने : ₹ १०८००/- १ वार्षीक : ₹ 19800/- नियमित प्रशिक्षणात लक्ष्य आणि गोळ्या स्वतंत्रपणे खरेदी करणे आवश्यक आहे. गोळ्या मूलभूत ₹350/- आगाऊ : ₹500-550/- लक्ष्य : (रायफल) 500 लक्ष्य ₹350/- (पिस्तूल) 100 लक्ष्य ₹150/- आगाऊ शस्त्र भाडे : ₹900/- 3 महिन्यांसाठी वापरण्यासाठी मूलभूत रायफल विनामूल्य, याचबरोबर महानगरपालिकेचे तीन तरण तलाव असून अनुक्रमे , विरार पूर्व पापडखिंड तलाव, नवघर माणिकपूर अंबाडीरोड वसई पश्चिम, तालातलाव वसई गाव वसई पश्चिम हे आहेत. यातरणतलावामध्ये सराव शुल्क पुढील प्रमाणे आहे. सभासद फॉर्म फी- २५, प्रवेश शुल्क रु. २००, निर्देशक शुल्क रु ३६०, वार्षिक सभासद शुल्क रु. ४०००, सहामाही सभासद शुल्क रु. २५००, त्रेमासिक सभासद शुल्क १३००, मासिक शुल्क रु ५००. शालेय विद्यार्थी वय १६ वर्षाआतील यांचे करिता तसेच ६० वर्षावरील व्यक्तींकरिता सभासद शुल्का मध्ये ५० टक्के सवलत आहे . त्याचबरोबर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना विनामूल्य प्रवेश आहे . तरण तलावामध्ये बॅच प्रमाणे सराव करण्याची सुविधा असुन सकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंतची वेळ आहे. दर सोमवारी देखभाली करीता तिनही एल बंद ठेवण्यात येतात.
N.A
N.A
तीन जलतरण तलाव अनुक्रमे १) विरार पापडखिंड विरार पूर्व २) अंबाडीरोड नवघर पश्चिम ३) तामलतलाव वसई गाव
NIL
NIL
एकूण १२ मैदाने आहेत. विकसित ,८ काम प्रगतीपथावर ४
एकूण १२ मैदाने आहेत . १) बोळींज म्हाडा मैदान , जकात नाका , विरार पश्चिम २) विराट नगर मैदान, विराट नगर , विरार पश्चिम ३) जीवदानी मैदान, विरार जीवदानी मंदिर पायथा, विरार पूर्व ४) वसंत नगरी मैदान, वसंत नगरी, आचोळे, नालासोपारा पूर्व ५) सोपारा मैदान, सोपारा पोलीस स्टेशन मागे ६) झालावाड मैदान, झालावाड नालासोपारा पूर्व ७) शूपारक क्रिकेट ग्राउन्ड, सोपारा पोलीस लगत, नालासोपारा पश्चिम ८) हितेंद्र ठाकूर ( अप्पा मैदान ), वालिव, वसई रोड पूर्व ९) चुळणे मैदान, चुळणे गाव चुळणे, वसई रोड पूर्व १०) क्रिष्णा टाउन शिप मैदान, क्रिष्णा टाऊन शिप, ओमनगर परिसर, वसई रोड पश्चिम ११) कौलसिटी मैदान, कौल्सिटी, चुळणे गाव परिसर, वसई रोड, पश्चिम १२) चिमाजी अप्पा मैदान , न्यू इंग्लिश महाविद्यालय समोर, वसई गाव , वसई पश्चिम
राज्य, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावर पदक विजेता खेळाडू तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेले परंतु पदक न मिळवू शकलेले खेळाडू त्याबरोबर साहसी खेळांतर्गत उल्लेखनीय कामगिरी व कीर्तिमान स्थापित केलेल्या खेळाडूंना प्रोत्साहनपर रोख बक्षीस देण्यात येते, याकरिता रु ५००० तें ४० लक्ष पर्यंत प्रोत्साहन पर बक्षीस देण्याची तरतूद महापालिके मार्फत करण्यात आली आहे.
दिगंबर पाटील, लिपिक क्रीडा व सांस्कृतिक विभाग, कार्यालयीन संपर्क ०२५०-२५२५१०५