सामान्य प्रशासन विभाग
विभागाची थोडक्यात माहिती :-
1) लोकशाही दिन आयोजन करणे.
2) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अहवाल.
3) भ्रष्टाचार निर्मुलन समिती अंतर्गत प्रकरणे समन्वय.
4) ध्वजनिधी संकलन.
5) शासनाच्या निर्देशानुसार दिलेल्या जयंती / पुण्यतिथी साजरी करणे.
6) महानगरपालिकेचे उपविधी / नियम तयार करण्याबाबत समन्वय.
7) सामान्य प्रशासन विभागातील माहिती अधिकार अर्ज.
8) नागरीकांची सनद तयार करणे.
9) इतर प्रशासकीय तथा संकिर्ण स्वरुपाची कामे.
विभागाची कामे :-
1) मा. आयुक्त कार्यालय लोकशाही दिन (महानगरपालिका) आयोजन करणे व मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त लोकशाही दिनाचे नियोजन करणे व नागरीकांनी लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचा पाठपुरवा करणे.
2) मा. तालुका लोकशाही दिन (तहसिल कार्यालय, वसई) मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त मा. तालुका लोकशाही दिनाबाबत प्रभाग समिती कार्यालयाशी संपर्क साधुन पत्रव्यवहार करणे.
3) मा. जिल्हाधिकारी कार्यालय लोकाशाही दिन (जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर) मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त मा. जिल्हाधिकारी कार्यालय लोकाशाही दिनाबाबत प्रभाग समिती कार्यालयाशी संपर्क साधुन पत्रव्यवहार करणे.
4) मा. जिल्हाधिकारी कार्यालय महिला लोकाशाही दिन (जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर) मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त मा. जिल्हाधिकारी कार्यालय महिला लोकाशाही दिनाबाबत प्रभाग समिती कार्यालयाशी संपर्क साधुन पत्रव्यवहार करणे.
5) मा. विभागीय आयुक्त कार्यालय लोकशाही दिन (कोकण भवन), मा. विभागीय आयुक्त कार्यालय महिला लोकशाही दिन (कोकण भवन) मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त मा. विभागीय आयुक्त कार्यालय लोकशाही दिनाबाबत प्रभाग समिती (सर्व) कार्यालयाशी संपर्क साधुन पत्रव्यवहार करणे.
6) मा. मंत्रालयीन लोकशाही दिन (मंत्रालय,मुंबई) मा. उप- आयुक्त (सा.प्र.) यांचे अधिनस्त समन्वय.
7) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अहवाल प्रभाग समिती (सर्व), नगर रचना विभाग व अग्निशमन विभागातून प्राप्त अहवालाचे एकत्रिकरण करुन मा. मंत्रालय,मुंबई व मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांना पाठविणे.
8) भ्रष्टाचार निर्मुलन समिती अंतर्गत प्रकरणाबाबत मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त प्रभाग समिती (सर्व) यांचेशी समन्वय साधुन पत्रव्यवहार करणे व पाठपुरावा करणे.
9) मा. आयुक्त, मा. अति. आयुक्त व मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन, सैनिक कल्याण विभाग यांच्या मार्फत प्राप्त सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन साहित्य वाटप करणे व सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करुन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे/ पालघर यांचे कार्यालयात जमा करणे व पाठपुरावा करणे.
10) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रकान्वये वेळोवेळी निर्गमित होणा-या राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त साजरे करणे.
11) मा. अति. आयुक्त व मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त महानगरपालिकेचे उपविधी / नियम तयार करण्यासाठी विभाग प्रमुख (सर्व) यांचेशी समन्वय साधुन पत्रव्यवहार करणे व पाठपुरावा करणे.
12) सामान्य प्रशासन विभागातील माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये नागरीकांना दाखल केलेल्या अर्जावर मुदतीत उत्तर देणे. तसेच मा. आयुक्त, मा. अति. आयुक्त व मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांचे आदेश पारीत करणे.
13) मा. उप-आयुक्त (सा.प्र.) यांच्या अधिनस्त इतर प्रशासकीय तथा संकिर्ण स्वरुपाची कामे करणे.
आकृतीबंध
अधिकारी
नाव | पदनाम | संपर्क क्रमांक | ईमेल |
---|---|---|---|
सदानंद पुरव | उपायुक्त | 9119197999 | |
संतोष पाटील | अतिरिक्त महापालिका आयुक्त | 8087198932 | |
अक्षय मोखर | वरिष्ठ लिपीक | 9503592894 | |
परिणिता कोरे | लिपिक टंकलेखक | 9673057322 |