वसई-विरार शहर महानगरपालिका विवाह नोंदणी विभागाची माहिती
विभागाचे नाव: विवाह नोंदणी विभाग
विभागाची थोडक्यात माहिती :-
1)नागरीकांना विवाह नोंदणी संबंधित माहिती देणे.
2)नागरीकांचे विवाह संबंधित अर्ज व कागदपत्रके तपासणे.
3)विवाह नोंदणीची रजिस्टर मध्ये नोंद करणे.
विभागात कार्यरत असलेल्या प्रमुखाची नाव व हुद्दा :-
अधिकाऱ्याचे नाव | पद | ई-मेल |
---|---|---|
श्री.समीर भूमकर | उपायुक्त | vvcmcmarriage@gmail.com |
श्री. प्रितम अनिल मोहिते | लिपीक/टंकलेखक | vvcmcmarriage@gmail.com |
कु.प्रियांका प्रभाकर चोरघे | लिपीक/टंकलेखक (ठेका) | vvcmcmarriage@gmail.com |
कु. सारिका अनंत म्हात्रे | लिपीक/टंकलेखक (ठेका) | vvcmcmarriage@gmail.com |
विभागाची कामे:-
1)महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनिमय/ विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार वसई विरार शहर महानगरपालिकेत विवाह नोंदणी करण्यात येते.
2)वर किंवा वधु यापैकी कोणीही एक वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दित रहिवास करित असेल तरच सदर क्षेत्र महापालिकेच्या ज्या विभागाच्या (प्रभाग समिती) अखत्यारित येते त्या संबधित विभाग (प्रभाग समिती) कार्यालयात विवाह नोंदणी करता येईल. तसेच फक्त महाराष्ट्रात संपन्न झालेल्या विवाहाची नोंदणी करण्यात येईल.
3)वराचे वयाचे 21 वर्ष व वधुचे वयाचे 18 वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे त्यानंतरच त्याच्या विवाहाची नोंद करण्यात येईल.
4)वर व वधुचा वयाचा पुरावा, वर व वधुचा रहिवास पुरावा (वधुचे लग्नाअगोदरचे पुरावे असणे आवश्यक आहे.) तसेच तीन साक्षीदार असणे आवश्यक आहे.(साक्षीदार वधु व वराच्या वयाचे किंवा त्याच्या पेक्षा वयाने मोठे असावे)
5)मुस्लीम धर्मीयांकरिता त्यांच्या निकाहाची निकाहनामा प्रत (इंग्रजीमधील) जोडणे आवश्यक आहे.
6)भिन्न धर्मींय वर-वधू यांच्या विवाहाची महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन व विवाह नोंदणी अधिनियम 1998 अंतर्गत सदरच्या फॉर्म नुसार नोंदणी करता येत नाही. या कायदयाखाली विवाह नोंदणी करण्यासाठी वर-वधू दोघेही समानधर्मीय असणे आवश्यक
आहे. तथापी, विवाह करण्यापूर्वी दोघांपैकी एकाने धर्मांतर करुन विवाहातील दुस-या पक्षकाराचा धर्म स्विकारुन ते दोघे समानधर्मीय झाल्यानंतर (हि/मु. फक्त) त्यांनी केलेल्या विवाहाची नोंदणी या कायद्याखाली करताना त्यांनी खालील आशयाची,-
1)स्वइच्छेने धर्मांतर केल्याबाबतचे धर्मांतरीत व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र.
2)त्याचे/तिचे धर्मांतर ज्या व्यक्तीने केले त्यांचे प्रतिज्ञापत्र.
3)अशा प्रकारे दोघेही एकधर्मीय झाल्यानंतर दोघांचे संयुक्त प्रतिज्ञापत्र, अशी एकूण 03 प्रतिज्ञापत्रे विवाहाच्या दिनांकापूर्वी पक्षकारांपैकी एकाच्या नावे तसेच धर्मांतर पंडीत/काझी यांच्या नावे खरेदी केलेल्या रुपये 100 च्या स्टॅप पेपरवर करणे आवश्यक आहे.