अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्रकारिता प्राधिकरणाने केलेल्या ठरावानुसार शुल्क आकारले जाते.
अग्निशामक विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी प्राधिकरणाने केलेल्या ठरावानुसार शुल्क आकारले जाते. अग्निशमन विभागाकडून महानगर पालिका क्षेत्राबाहेर पहिल्या तीन तासाकरिता ४०००/- व पुढील प्रत्येक तासाला १०००/ या प्रकारे शुल्क आकारण्यात येते.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात संपर्क करावा व अग्निशमन विभागाची सेवा प्राप्त करून घेण्यासाठी पुढिल नमुद केल्या प्रमाणे कार्यवाही करावी. १) अग्निशमन दलास दुरध्वनी संपर्कअन्वये दुर्घटनेबाबत अचूक माहिती देणे . २) दुर्घनेस्थळा बाबत अचूक माहिती देणे ३) स्वतःचे नाव व स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक देणे ४) फोन ठेवल्यानंतर अग्नीशमन वाहन घटनास्थळी येईपर्यंत त्यांची वाट पाहणे. ५) अग्निशमन वाहन कमर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होताच त्यांना समक्ष भेटून आपण फोन केल्याचे सांगून दुर्घनेबाबत अवगत करणे व आवश्यकतेनुसार सहकार्य करणे.
आगीसारखी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात संपर्क करावा व अग्निशमन विभागाची सेवा प्राप्त करून घेण्यासाठी पुढिल नमुद केल्या प्रमाणे कार्यवाही करावी. १) अग्निशमन दलास दुरध्वनी संपर्कअन्वये दुर्घटनेबाबत अचूक माहिती देणे . २) दुर्घनेस्थळा बाबत अचूक माहिती देणे ३) स्वतःचे नाव व स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक देणे ४) फोन ठेवल्यानंतर अग्नीशमन वाहन घटनास्थळी येईपर्यंत त्यांची वाट पाहणे. ५) अग्निशमन वाहन कमर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होताच त्यांना समक्ष भेटून आपण फोन केल्याचे सांगून दुर्घनेबाबत अवगत करणे व आवश्यकतेनुसार सहकार्य करणे.
अग्निशमन कर्मचारी आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना व बचाव कार्यात प्रशिक्षित असतात. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या अग्निरोधक व जीवन रक्षण प्रणालींच्या वापराबाबत वेळोवेळी प्रशिक्षण व सराव दिला जातो. या प्रशिक्षणामुळे विविध प्रकारच्या अपघातांच्या वेळी कर्तव्य बजावताना अपघातग्रस्तांचे प्राण व मालमत्ता वाचवणे शक्य होते. विविध प्रकारच्या अपघातांमध्ये अडकलेल्या आपत्तीग्रस्तांना अग्निशमन कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणातून प्राप्त झालेल्या कौशल्यांच्या आधारे शोध व बचाव कार्याच्या माध्यमातून सुरक्षितरित्या बाहेर काढता येते.
१) आग लागणे २) झाड पडणे ३) चक्रीवादळ ४) अतिवृष्टी ५) महापुर ६) भुकंप ७) पाण्यात मनुष्य बुडणे ८) रेल्वे अपघात ९) जहाज अपघात १०) रस्ते अपघात ११) हवाई वाहतूक दुर्घटना १२) दंगल १३) वन्य प्राणी नागरी नस्तीत येणे १४) घरात साप शिरणे १५) पक्षी पतंगीच्या मांज्यात अडकणे १६) प्राणी विहिरीत पडणे १७) विसर्जन बंदोबस्त १८) अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलीपेड बंदोबस्त १९) यात्रा बंदोबस्त २०) रस्त्यात तेल सांडणे २१) घरगुती गॅस सिलेंडर गळती २२) गॅस सिलेंडरचा स्फोट २३) विजेच्या तारा तुटणे २४) ट्रान्सफॉर्मर स्फोट २५) रेल्वे अपघात २६) रस्ता वाहतुकीतील अपघात २७) पुलावरून पडल्याबाबतचा अपघात २८) स्फोटक पदार्थ सापडणे २९) रासायनिक अपघात ३०) विषारी वायू गळती ३१) आतंकवादी कारवाया ३२) लॅच लॉक ३३) छत कोसळणे ३४) स्लॅब कोसळणे ३५) क्रेन कोसळणे ३६) लिफ्ट मध्ये माणसे अडकणे ३७) गटारात माणूस पडणे ३८) विजेच्या खांब्यावर माणुस अडकणे ३९) रेल्वे पेंटाग्राफमध्ये मनुष्य अडकने ४०) खेळण्याच्या आकाश पाळण्यात मनुष्य अडकणे इतर
अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा .
अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र मिळणेसाठी सात दिवसाचा कालावधी लागतो.
अग्निशमन विभागामार्फत नागरिकांना संभाव्य आगीच्या दुर्घटनांबाबत माहिती देण्यात येते. जसे आग लागण्याची कारणे, आगीसाठी आवश्यक असणारे घटक, आगीचे प्रकार, आग विझवण्याच्या पद्धती, आग विझवण्यासाठी आवश्यक असलेले घटक विविध स्वरूपाचे अग्निशामक वापरण्याच्या पद्धती प्रथमोपचार, विविध रस्सीच्या गाठीचे प्रकार , रुग्ण उचलण्याच्या पद्धती, आग लागू नये म्हणुन घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना, आग लागल्यावर प्रत्यक्ष दर्शनि करावयाची कर्तव्य, आग विझविण्याच्या कालावधीत घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाय योजना, आग विझविल्यानंतर करावयाची कामे तसेच इतर दुर्घटना बाबत घ्यावयाची काळजी व करावयाची उपाययोजना याबाबत प्रशिक्षण देण्यात येते.
अग्नीशमन विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे स्वरूप प्राथमिक आहे.
विनाशुल्क.
अग्निशमन विभागाद्वारे नागरिकांना संभाव्य आग लागण्याच्या अपघातांबाबत माहिती दिली जाते. जसे की आग लागण्याची कारणे, आग लागण्यासाठी आवश्यक घटक, आगचे प्रकार, आग विझवण्याचे प्रकार, आग विझवण्यासाठी लागणारे घटक, विविध प्रकारचे अग्निशामक वापरण्याच्या पद्धती, प्राथमिक उपचार, विविध प्रकारच्या दोरगाठी बांधण्याच्या पद्धती, रुग्णांना उचलण्याच्या पद्धती, आग प्रतिबंधक उपाययोजना, आग लागल्यावर थेट अग्निशामकांची काय जबाबदारी असते, आग विझवताना घ्यावयाची काळजी, आग लागल्यानंतर व इतर अपघातांनंतर घ्यावयाची काळजी व उपाययोजनांबाबत प्रशिक्षण दिले जाते.