VVCMC ने 21 सप्टेंबर 2024 रोजी 'आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप डे' निमित्त 'राजोडी बीच' येथे लाइव्ह वेस्ट रिसायकलिंग प्रात्यक्षिकांसह "बीच क्लीनिंग ड्राइव्ह" आयोजित केले आहे.
राजकीय नेते, शहराचे पहिले नगराध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. सुमारे 15000+ स्वयंसेवक उपस्थित होते. यात 17 महाविद्यालये आणि 57 शाळा, 3 स्वयंसेवी संस्था, 10 बचत गट उपस्थित होते. अंदाजे राजोडी बीचवर 51+ टन कचरा गोळा केला आणि 650 किलो कचरा थेट पुनर्वापर केला.


VVCMC ने 21 सप्टेंबर 2024 रोजी राजोडी बीचवर स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहीम (एक पेड माँ के नाम) कार्यक्रम घेतला.
150 हून अधिक रोपे लावण्यात आली आणि 200 हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.


आज जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने, वसई विरार शहर महानगरपालिकेने किनारपट्टी स्वच्छता मोहिम राजोडी किनाऱ्यालगत राबवली. या स्वच्छता मोहिमेची सुरुवात प्रमुख पाहुणे वसई विरार शहराचे प्रथम महापौर राजीव पाटील यांनी कचरा उचलून केली. यानंतर मोहिमेस सुरुवात होऊन तब्बल ५१ टन कचरा जमा करण्यात आला आहे.
वसई विरार महानगरपालिकेने आयोजित केलेल्या सागरी किनारा स्वच्छता मोहिमेस विद्यार्थी नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, बचत गटाच्या महिला, अग्निशमन जवान आणि नागरिक आदी १३ हजारहून अधिक जणंनी स्वच्छता मोहिमतेत हिरिरीने सहभाग घेतला. ज्यामुळे जागतिक विक्रम घडला, हा विक्रम, नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्यात येत आहे.
दिनांक 23 ते 25 सप्टेंबर 2024 रोजी वसई विरार शहर महागरपालिके मार्फत सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियातील सदस्य यांचे करिता शासकीय योजने चा लाभ मिळवुन देण्याकरिता शिबिर भरविण्यात आले. सदर शिबिर मद्ये लाडकी बहिण, स्वच्छ भारत अभियाांतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय तसेच या योजनेचे लाभ देण्यात आले


दिनांक 26 September 2024 रोजी स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत ‘Waste To Art Exhibition’ व ‘Street Food’ याचे आयोजन केलेले, सदर मोहिमेत 20 महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अतिरिक्त आयुक्त श्री. रमेश मनाळे सो, मा. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) श्री. नानासाहेब कामठे सो, मा सहा. आयुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री सुकदेव दरवेशी सो व मा सहा. आयुक्त प्रभाग समिती ‘C’ श्री. विक्टर डिसुझा यांच्या उपस्थितीत पार पाडले.

