नागरी गरीब लोक, नागरी गरीब लोक, त्यांच्या संस्थांची क्षमता बांधणी करणे, उपजीविकेचा विकास व नागरी दारिद्रय निर्मुलन करणारी यंत्रणा यांची क्षमता वाढविणे.
नागरी गरीब कुंटूंबातील व्यक्तींना उपजीविकेच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे,
बाजाराच्या औद्योगिक गरजेनुसार व आवश्यकतेनुसार, विविध क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन नागरी गरीब व्यक्तींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
नागरी गरिबांच्या लघूउद्योगांना चालना देणे.
नागरी बेघर लोकांसाठी कायमस्वरूपी व मुलभूत सोयी सुविधा असलेल्या निवाऱ्याची सोय करणे.
नागरी फेरीवाल्यांच्या उपजीविकेच्या समस्या सोडवून त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.