माहिती तंत्रज्ञान विभाग
वसई-विरार शहर महानगरपालिका माहिती तंत्रज्ञान विभागाची माहिती
विभागाचे नाव: माहिती तंत्रज्ञान विभाग
विभागाची थोडक्यात माहिती :-
1. ई- गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत विविध कामांचे संगणकीकरणे करणे.
2. महानगरपालिकेचे संकेतस्थळ व ॲप अद्यावत ठेवणे.
3.महानगरपालिकेतील विभागाअंतर्गत दैनदिन कामकाजाकरीता संगणक, प्रिंटर पुरविणे त्याची
देखभाल दुरुस्ती करणे, इंटरनेट सुविधा पुरविणे व कार्यालया अंतर्गत सी.सी टिव्ही यंत्रणा बसविणे
व त्याची देखभाल दुरुस्ती करणे.
विभागात कार्यरत असलेल्या प्रमुखाची नाव व हुद्दा :-
अधिकाऱ्याचे नाव | पद | ई-मेल |
---|---|---|
मा. श्री. समीर भूमकार | उपायुक्त | |
श्री. हर्षल पाटील | विभाग प्रमुख कनिष्ठ अभियंता | it.vvmc@gov.in |
श्री. प्रमोद चव्हाण | लिपीक | it.vvmc@gov.in |
विभागाची कामे:-
1.माहिती व तंत्रज्ञान विभागातील सर्व कामाचे व्यवस्थापन करणे तसेच मा. आयुक्त व मा. उपायुक्त यांच्या संपर्कात राहून कामाचे नियोजन करणे.
2.महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणाची अंमलबजावणी करणे तसेच मा. राज्य शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सुचना व निर्णय यांच्या अधिन राहून त्यावर कार्यवाही करणे.
3.ई- गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत विविध दैनंदिन कामांचे संगणकीकरणे.
4.महानगरपालिकेचे संकेतस्थळ व ॲप अद्यावत ठेवणे.
5.वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभागांतून व विविध विभागांमध्ये करण्यात येणाऱ्या ई-टेंडरींग संदर्भातील कामकाजात येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविणे.
6.महानगरपालिकेच्या मुख्यालयातील व 9 प्रभागातील सर्व विभागीय कार्यालयात इंटरनेट पुरविणे व
नेटर्वक कनेक्टीविटी करणे व कार्यन्वित ठेवणे.
7.केंद्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आपले सरकार व P.G Portal वर नागरिकांच्या आलेल्या
ऑनलाईन तक्रारी निवारणाबाबत पाठपुरवठा करणे.
8.फेसबुक पेज, ट्विटर पेज व युट्युब वर महानगरपालिकेच्या महत्वाच्या घडामोडी प्रकाशीत करणे.
9.ऑनलाईन लसीकरण सत्र बनविणे.