Swachh Bharat 2023

  • Home
  • Swachh Bharat 2023

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत आयोजित “एक तारीख एक तास” या मोहिमेत आज – दि. ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात एकण ९७ ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली.

दि.०२/१०/२०२३ “स्वच्छता ही सेवा” अभियांतर्गत महानगरपालिकेतर्फे स्वच्छता दूत, माजी सैनिक तसेच देशसेवेसाठी शहीद झालेल्या वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान

केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्यमंत्रालय (MoUHA) केंद्र शासन यांनी दि.०६/११/२०२३ ते दि.१३/११/२०२३ रोजीपर्यंत “स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी” या स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी करावयाचे निर्देश दिले होते. त्यांनुषंगाने ‘सी’ प्रभाग समिती कार्यालय,घनकचरा व्यवस्थापन विभाग, वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिनांक ०९/११/२०२३ रोजी महिला बचत गटांच्या साहाय्याने पुऱ्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.तसेच शपथ विधी व स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली. मा.आयुक्त महोदय यांच्या हस्ते सदर प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. महिला बचत गटांमार्फत कापडा पासून बनविलेले वस्तूंचे कागदी कंदील, हॅन्ड क्राफ्ट वस्तू, रसायन विरहित कॉस्मेटिक इ. पर्यावरणपूरक वस्तू सदर प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्या होत्या. वसई विरार शहर महानगरपालिकेचे मा. उपायुक्त, मा. सहाय्यक आयुक्त व इतर विभागाचे कर्मचारी सदर प्रदर्शनामध्ये उपस्तिथ होते.

Skip to content